तिरुमला : येथील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सोमवारी श्री कृष्णजन्माष्टमी उत्सव जल्लोषात होणार आहे. करोनाचे नियम पाळून सोमवार व मंगळवारी विशेष पूजा होणार आहे. मुख्य देवतेसह श्री उग्र श्रीनिवासमूर्ती, श्रीदेवी, भूदेवी, श्री कृष्णस्वामी मंदिरात विधी होणार आहेत. गोगर्भम गार्डन्समध्ये श्री कालियामर्दन कृष्णास विशेष अभिषेक केला जाणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी १९,५२५ भक्तांनी गोविंदा अर्थात श्री व्यंकटेशाचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानमने दिली आहे.







