Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या देखण्या मुखपृष्ठाने सजलेला साहित्यदीप दिवाळी अंक

हटके काम करणा-यांचा अंकात आहे परिचय

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 10, 2021
in कविता/साहित्य
0
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या देखण्या मुखपृष्ठाने सजलेला साहित्यदीप दिवाळी अंक

साहित्यदीप या दिवाळी अंकातून आपल्याला वैविध्यपूर्ण साहित्याचा आस्वाद घेता येईल. कथा, कवितांबरोबरच एक वेगळा विषय घेऊन साहित्यदीप आपल्यासमोर आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण पण हटके काम करणा-या व्यक्तींचा परियय यात करून देण्यात आला आहे. त्यात पक्षिमित्र किरण पुरंदरे, लाकडावरील कोरीव काम करणारे श्रीपाद चिलकवाड, चंदेरी जगतात वेगळी वाटचाल करणारी सुनंदा काळुसकर, मूर्तिकलेचा वेगळा अविष्कार पुष्पा द्रविड, सर्पमित्र निलिमकुमार खैरे यांचा समावेश आहे. या मुलाखती म्हणजे त्या त्या क्षेत्राची नेमक्या शब्दांतली माहितीच आहे. चिलकवाड यांची मुलाखत घेतलीय स्वाती सामक यांनी तर, द्रविड यांची मुलाखत नूतन शेटे यांनी घेतलीय. खैरे यांच्याशी संवाद साधला आहे मेधावी तडवळकर-राजवाडे यांनी. अंकाच्या मुख्य संपादक आणि प्रकाशक आहेत ज्योत्स्ना चांदगुडे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं देखणं मुखपृष्ठ अंकाला आहे. या दिवाळी अंकाला आणि साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वर्षभर होणा-या कार्यक्रमाला प्रा. मिलिंद जोशी, अड. विलास अत्रे, कवी वि. सु. चव्हाण, गझलकार राजेंद्र शहा, उद्योजक चंद्रशेखर मोरे, कवी डॉ. संदीप अवचट यांचे मार्गदर्शन लाभते. अंकासाठी कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, प्रतिभा पवार, माधुरी गयावळ, सतीश गयावळ, उदय कुलकर्णी, विजय शेंडगे आदींचे साह्य लाभले आहे. या अंकात वृंदा दिवाण, श्वेता कुलकर्णी, सुनेत्रा गायकवाड यांच्या कथा आहेत. या दिवाळी अंकाची किंमत १०० रुपये असून पृष्ठे ९६ आहेत.

 

Tags: diwaliincrediblemaharasthrajotsnachandgudemaharashtracultureदिवाळीअंकसाहित्यदीपसाहित्यदीपदिवाळीअंक
Previous Post

मोदींच्या हस्ते आद्य शंकराचार्यांच्या समाधीची पुनर्स्थापना

Next Post

`थिंक पॉझिटिव्ह` केवळ दिवाळी अंक नव्हे तर, चळवळही

Next Post
`थिंक पॉझिटिव्ह` केवळ दिवाळी अंक नव्हे तर, चळवळही

`थिंक पॉझिटिव्ह` केवळ दिवाळी अंक नव्हे तर, चळवळही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In