Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

इलेक्ट्रिक वाहनांची भारत मोठी बाजारपेठ : नितीन गडकरी

स्वदेशी बॅटरी किफायतशीर दरात देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 23, 2021
in आजचा भारत
2
इलेक्ट्रिक वाहनांची भारत मोठी बाजारपेठ : नितीन गडकरी

नवी दिल्ली : देश दुचाकी, तीनचाकी, कार अशा इलेक्ट्रिक वाहनांसाठीचा जगातील सर्वात मोठा बाजार होऊ घातला आहे आणि किफायतशीर दरात स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी येथे दिली. आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि भारत@75 ‘भारताचे सक्षमीकरण – उद्यासाठीचा आज’ च्या वार्षिक सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.

ते म्हणाले कि, स्टार्ट-अप्स आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील नवे व्यावसायिक पारंपरिक वाहन उद्योगांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग आणि वाढीव सरकारी खर्चामुळे देशातील पुरवठा साखळीमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या संधींमध्ये वाढ होत आहे.

नुकत्याच झालेल्या कॉप-26 शिखर परिषदेत 2070 या वर्षापर्यंत संपूर्ण शून्य कार्बन उत्सर्जन शक्य करण्यासाठी किंवा कार्बन तटस्थ देश होण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पंतप्रधानांनी निश्चित केलेल्या जबाबदारीशी आपण सर्वांनी एकरूप होऊन वागायला हवे, असे सांगून  ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, अभिनव संशोधने आणि डिजिटलीकरणयांच्यामुळे,देशात सर्व-समावेशक आणि शाश्वत विकास होईल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या या प्रवासात आपण एका वळणावर उभे आहोत, जिथे आपले सरकार आजच्याहून अधिक स्फूर्तीने सळसळता, आत्मनिर्भर आणि हवामानाप्रती अधिक लवचिक अशा भारताच्या भविष्यातील उभारणीसाठी मजबूत पावले उचलत आहे.

हरित महामार्ग अभियानाच्या अंतर्गत सरकार राष्ट्रीय महामार्गांलगत वृक्षारोपण आणि झाडांचे प्रत्यारोपण करत आहे आणि यामध्ये स्थानिक जनता, शेतकरी, स्वयंसेवी संस्था तसेच खासगी क्षेत्राचा अधिक सहभाग अपेक्षित आहे असे गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणूकीचे लाभ करून घेण्यासाठी या मार्गिकांलगत खासगी क्षेत्रांतील उद्योजक मोठी मालवाहतूक केंद्रे, स्मार्ट शहरे आणि औद्योगिक केंद्रे उभारण्यासाठी गुंतवणूक करू शकतील.

भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 65,000किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधला जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले कि या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकंदर 10 लाख कोटींहून अधिक भांडवली खर्चाचा सुमारे 35,000 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची योजना आहे.त्यापैकी 20,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या 2025 पर्यंत देशभरात 2 लाख किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले.

Tags: इलेक्ट्रीकवाहनेनितीनगडकरीभारत
Previous Post

सत्यजित रे यांचे चित्रपट निर्मात्यांना अखंड प्रेरणा देणारे

Next Post

औरंगाबादेत लस प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच पेट्रोल

Next Post
औरंगाबादेत लस प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच पेट्रोल

औरंगाबादेत लस प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच पेट्रोल

Comments 2

  1. MILIND Kulkarni says:
    4 years ago

    A very positive step for greem india,,,,,

    Reply
    • Team Rugvedas Studio says:
      4 years ago

      Thank you sir…

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In