Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

मराठी चित्रपट ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार

अभिनेता जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रौप्य मयूर पुरस्कार तर, दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
November 29, 2021
in आजचा भारत
0
मराठी चित्रपट ‘गोदावरी’ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पणजी : मराठी चित्रपट ‘गोदावरी’ला 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीमध्ये रविवारी दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जितेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबरोबरच निखिल महाजन यांचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला जाहीर होतो तेव्हा तो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येतो.

‘गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे”, असे गौरवोदगार परीक्षकांनी काढले.
गोव्याची राजधानी पणजी इथे गेले नऊ दिवस चाललेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीची रविवारी रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, या महोत्सवाच्या विविध स्पर्धा विभागाचे ज्युरी आणि भारतीय तसेच परदेशी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.


मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी निखिल महाजन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटामध्ये निशिकांत कामत या पात्राची गुंतागुंतीची भूमिका ज्या कौशल्याने साकारली आहे त्याविषयी आतरराष्ट्रीय परीक्षकांनी असे मत नोंदवले आहे की, त्रस्त झालेल्या निशिकांतचे आणि त्याच्‍या लालबुंद डोळ्यांचे चित्रण एकाचवेळी अतिशय प्रभावी आणि शोकपूर्ण केले आहे. चित्रपटात हे पात्र एकूणच अतिशय गुंतागुंतीचे असतानाही कलाकाराने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या रागातून वाहणारे अश्रू परिणामकारक ठरतात, असे कौतुक परीक्षकांनी केले आहे.
जितेंद्र जोशी यांना सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख यावेळी देण्यात आले.

निखिल महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट एका माणसाची त्याच्या गोदावरीशी असलेल्या नात्याने दिलेली प्रेरणा आणि प्रोत्साहन यातून पुरातन परंपरा आणि संस्कृती जपण्याची तात्विक आस दर्शवितो. या नदीचे 2020 मधील रूप दाखवून तिची भक्ती करणाऱ्यांचे वंशज शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटाचे परीक्षकांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. “गोदावरी हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे आणि बदलत्या काळात नद्या कशा प्रकारे विद्रूप होतात हे दाखविणारा एक मार्ग आहे” या पवित्र नदीमधील अतिप्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे तिचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे हे दाखविताना चित्रपटातील नायक संताप आणि अंतर्गत वादळाचा अनुभव घेतो, या चित्रपटातील प्रमुख पात्राचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांच्या माध्यमातून त्याची मनस्थिती अत्यंत समर्थपणे मंडळी आहे असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदविले.

 

Tags: इफ्फीगोदावरीगोवाजितेंद्रजोशीनिखिलमहाजनपणजीभारतमहाराष्ट्रसिनेमा
Previous Post

गाईच्या शेणापासून बनवले नाविन्यपूर्ण जीवाणूरोधक वस्त्र

Next Post

“मी वसंतराव” चित्रपटाला इफ्फीमध्ये मिळाली दाद

Next Post
“मी वसंतराव” चित्रपटाला इफ्फीमध्ये मिळाली दाद

“मी वसंतराव” चित्रपटाला इफ्फीमध्ये मिळाली दाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In