Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचे मोदींकडून निमंत्रण

गोवा मुक्ती दिन समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
December 19, 2021
in आजचा भारत
0
पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचे मोदींकडून निमंत्रण

पणजी : आपण पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे सांगितले. गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार केला.
पोपना भेटण्याची संधी मिळाली असल्याची आठवण त्यांनी जागवली. भारताप्रति पोप यांचा दृष्टीकोनसुद्धा तेवढाच सहृद्य होता. भारतात येण्याचे निमंत्रणही मला दिलेली ही सर्वोत्तम भेट आहे. ” अशा शब्दात फ्रान्सिस पोप यांनी या आमंत्रणाला प्रतिसाद दिला होता. भारतातील विविधता आणि झळाळती लोकशाही यांबाबत पोपना असलेली आत्मीयता, अशा शब्दांत पंतप्रधानांनी हा प्रसंग अधोरेखित केला. संत राणी केतवन याच्या पवित्र प्रतिमा जॉर्जियाच्या सरकारकडे हस्तांतरित करण्याबाबतही पंतप्रधानांनी सांगितले.
गोव्याची भूमी, गोव्याची हवा, गोव्याच्या समुद्राला निसर्गाची अद्भूत देणगी लाभली आहे, असे पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. आणि आज सर्वांचा, गोव्यातील जनतेचा हा उत्साह गोवा मुक्तीचा अभिमान द्विगुणित करत आहे. आझाद मैदानावरील शहीद स्मारकावर शहीद जवानांना आदरांजली वाहण्याचे सौभाग्य आपल्याला लाभल्याचे त्यांनी सांगितले. शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते मीरामारमधील सेल परेड आणि फ्लाय पास्टला उपस्थित राहिले. देशाच्या वतीने ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या वीरांचा आणि माजी सैनिकांना गौरवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आज गोवा इथे एकत्रपणे अनेक गोष्टी करायला मिळाल्या, अनेक आश्चर्यकारक अनुभवमिळाले याबद्दल पंतप्रधानांनी गोव्याच्या चैतन्यशील भावनेचे आभार मानले.

गोवेकरांचे केले अभिनंदन
भारताचा बहुतांश भाग मुघलांच्या अधिपत्याखाली असताना, गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला होता, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यानंतर झालेल्या अनेक उलथापालथींचा भारत साक्षीदार आहे. शतकानुशतके उलटून गेल्यावर आणि सत्तांच्या उलथापालथीनंतरही गोवा आपले भारतीयत्व विसरला नाही किंवा उर्वरित भारत गोव्याला विसरला नाही, असेही मोदींनी नमूद केले. हे असे नाते आहे, जे काळाबरोबरच अधिकाधिक घनिष्ठ होत गेले. गोव्यातील जनतेनेही मुक्तीसंग्राम आणि स्वराज्याच्या चळवळींचा जोर कमी होऊ दिला नाही. त्यांनी भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्याची ज्योत प्रदीर्घ काळ तेवत ठेवली.याचे कारण भारत ही केवळ एक राजकीय शक्ती नाही. भारत ही एक संकल्पना आहे आणि मानवतेच्या हिताचे रक्षण करणारे एक कुटुंब आहे. पंतप्रधान म्हणाले, की भारत ही एक अशी आत्मभावना आहे जेथे राष्ट्र ‘स्व’ च्या वर आहे आणि तिथे एकच सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. – राष्ट्र प्रथम; जिथे एकच संकल्प आहे – एक भारत, श्रेष्ठ भारत.

पंतप्रधान म्हणाले, की संपूर्ण भारतातील लोकांच्या मनात खदखद होती, कारण देशाचा एक भाग अजूनही मुक्त झाला नव्हता आणि काही देशवासियांना स्वातंत्र्य मिळालेले नव्हते. सरदार पटेल आणखी काही वर्षे जगले असते तर गोवा मुक्त होण्यासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांनी संग्रामात सहभागी झालेल्या वीरांना नमन केले. गोवा मुक्ती विमोचन समितीच्या सत्याग्रहात 31 सत्याग्रहींना त्यांचे प्राण गमवावे लागले. या बलिदानांची आणि पंजाबच्या वीर कर्नल सिंग बेनिपाल यांच्यासारख्या वीरांची आठवण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. “गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ भारताच्या संकल्पाचे प्रतीक नाही तर भारताची एकता आणि अखंडतेचा जिवंत दस्तावेज आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी दिवंगत मनोहर पर्रिकरांना आदरांजली वाहिली. “मला जेव्हा गोव्याची ही कामगिरी दिसते, नवी ओळख दृढ होताना दिसते तेव्हा मला मनोहर पर्रिकर या माझ्या मित्राची आठवण येते. त्यांनी गोव्याला विकासाची नवी शिखरेच गाठून दिली नाहीत तर गोव्याच्या क्षमतेत देखील त्यांनी वाढ केली. एखादी व्यक्ती आपल्या राज्यासाठी, तेथील जनतेसाठी स्वतःला किती प्रमाणात वाहून घेऊ शकते, तर शेवटच्या श्वासापर्यंत, याचे दर्शन त्यांच्या जीवनाने आम्हाला घडवले. संपूर्ण देशाने मनोहर पर्रिकरांमध्ये प्रामाणिकपणा, हुशारी आणि माणसांचा व्यासंगाचे प्रतिबिंब पाहिले.” असे पंतप्रधानांनी सांगितले.

Tags: goanarendramodipanajipopefransis
Previous Post

पुण्यात फोर व्हिलरसाठी लवकरच नवीन मालिका

Next Post

तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांत 88% वाढ

Next Post
तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांत 88% वाढ

तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांत 88% वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In