Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

अत्तर व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडूत कारवाई

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 6, 2022
in आजचा भारत
0
अत्तर व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे

नवी दिल्‍ली : प्राप्तिकर विभागाने 31.12.2021 रोजी परफ्युम उत्पादन आणि बांधकाम व्यवसायात गुंतलेल्या दोन समूहांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये 40 हून अधिक परिसरात शोधमोहीम राबवली गेली.
मुख्यतः मुंबई आणि उत्तर प्रदेशातील पहिल्या समूहाच्या बाबतीत, शोध मोहिमेत असे दिसून आले की हा समूह परफ्युमची विक्री कमी झाल्याचे दाखवून, साठ्यामध्ये हेराफेरी करून, करपात्र उत्पन्नातून नफा करमुक्त उत्पन्नात वळवण्यासाठी खातेवहीत फसवेगिरी करून, वाढीव खर्च दाखवून कर चुकवेगिरीत सामील आहे. बोगस खरेदी बिले दाखवून 5 कोटी रुपयांपर्यंतची अफरातफर केल्याचे पुरावे आढळले आहेत.
दोषी पुराव्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की त्यामुळे निर्माण झालेले बेहिशेबी उत्पन्न मुंबईतील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन्ही देशांतील मालमत्ता संपादनात गुंतवले आहे. या समूहाने विक्रीसाठी असलेल्या मालाचे संबंधित उत्पन्न लपवून ते भांडवल म्हणून दाखवून 10 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या समूहाने सेवानिवृत्त भागीदारांना देय लाभापोटीचे 45 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केलेले नाही.
संयुक्त अरब अमिरातीमधील समूहाच्या एका कंपनीने कथित 16 कोटी रुपये समूहाच्या एका भारतीय कंपनीमध्ये बाजार मूल्यापेक्षा अधिक प्रीमियम दाखवून अवैध शेअर भांडवल सादर केले आहे. या प्राप्तकर्ता समूह कंपनीने कोलकाता स्थित काही बनावट संस्थांकडून बेकायदेशीर भाग भांडवलाच्या रूपात 19 कोटी रुपये प्राप्त केले आहेत.
आत्तापर्यंत 9.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशोबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. अनेक बँक लॉकर्स प्रतिबंधित करण्यात आले असून ते अद्याप तपासायचे आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Tags: incometaxitraidmumbairaidup
Previous Post

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा वेळापत्रकानुसारच

Next Post

स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उदघाटन

Next Post
स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उदघाटन

स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In