Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

कीर्ती शिलेदार यांचे निधन

सहा दशकांचा सूर हरपला

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
January 22, 2022
in आजचे पुणे
0
कीर्ती शिलेदार यांचे निधन

पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार (वय ७०) यांचे शनिवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
२०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्या जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या त्या कन्या होत. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. अखेरपर्यंत त्या रंगभूमीशी जुळलेल्या तर होत्याच आणि नवोदितांना मार्गदर्शन करीत होत्या. सुमारे सहा दशके त्यांनी अभिनयाने व गायनाने रंगभूमीवर आपला ठसा उमटवला.


संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर ठरल्या आहेत. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा अनुभूती त्यांनी रसिकांना दिली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता.

लहानपणापासून नाटकात कामे
संगीत रंगभूमी गाजवणाऱ्या कीर्ती शिलेदार कालवश. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.
आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले.पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.

Tags: indiaindianmusickirtishiledarmaharashtramarathinatakmarathisangitnatakmusicpuneकीर्तीशिलेदारकीर्तीशिलेदारनिधनपुणेमराठीनाटक
Previous Post

अमर जवान ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ

Next Post

मुरुगन मंदिरात कुंभाभिषेक

Next Post
मुरुगन मंदिरात कुंभाभिषेक

मुरुगन मंदिरात कुंभाभिषेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In