Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

हुशार उमेदवारांनाच मिळणार रेल्वेच्या नोकऱ्या

किमान पात्रता गुण, वैद्यकीय मानके पूर्ण करण्याची अट कायम

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
February 2, 2022
in आजचा भारत
0
हुशार उमेदवारांनाच मिळणार रेल्वेच्या नोकऱ्या

नवी दिल्ली : प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार कायद्याच्या तरतुदींतर्गत भारतीय रेल्वे ऑगस्ट 1963 पासून नियुक्त आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देत आहे. या उमेदवारांना कोणत्याही स्पर्धा किंवा निवडीशिवाय त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिकाऊ उमेदवार म्हणून घेतले जाते.अशा उमेदवारांना रेल्वेने केवळ प्रशिक्षण देणे जरी बंधनकारक असले तरी ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांना 2004 पासून स्तर 1 च्या पदांवर पर्यायी नियुक्ती दिली जात आहे.


पर्यायी नियुक्ती ही तात्पुरती नियुक्ती असून या पदांवरील व्यक्तींना कोणतीही अत्यावश्यकता आणि कार्यान्वयन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. अशा नियुक्त्यांना लाभ दिलेले असले तरीही , ते तात्पुरते रेल्वे कर्मचारी असल्यामुळे त्यांना विहित प्रक्रियेशिवाय कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी ते हक्कदार नाहीत.
भारतीय रेल्वेच्या सुरु असलेल्या परिवर्तनाच्या दृष्टीने आणि निष्पक्षता आणण्याच्या दृष्टिकोनातून, रेल्वेच्या सर्व भर्तीमध्ये पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता असावी , यादृष्टीने रेल्वेने 2017 मध्ये स्तर 1 पर्यंत सर्व भर्ती प्रक्रिया केंद्रीकृत केली असून यापुढे सामान्य देशव्यापी संगणक आधारित चाचणीद्वारे (सीबीटी ) आयोजित केली जाते.

Anu Menon.

2014 मध्ये प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार कायद्यात सुधारणा करण्यात आली, या सुधारणेद्वारे , नियोक्ता त्याच्या आस्थापनेत प्रशिक्षित शिकाऊ उमेदवारांची भर्ती करण्यासाठी एक धोरण तयार करेल अशा प्रकारची तरतूद कायद्याच्या कलम 22 मध्ये करण्यात आली. या सुधारणेच्या अनुषंगाने, भारतीय रेल्वेने खुल्या भर्तीमध्ये रेल्वे आस्थापनांमध्ये प्रशिक्षित शिकाऊ उमेदवारांना, जाहिरात दिलेल्या पदांच्या 20% मर्यादेपर्यंत स्तर 1 पदांसाठी प्राधान्य देण्याची तरतूद केली आहे.
या शिकाऊ उमेदवारांनी इतर उमेदवारांसह लेखी परीक्षा दिली असता, त्यांना किमान पात्रता गुण आणि वैद्यकीय मानके पूर्ण करण्याच्या अधीन राहून इतरांच्या तुलनेत नियुक्तीमध्ये प्राधान्य दिले जाते.


त्यानुसार, सीईएन 02/2018 मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार ,अशा उमेदवारांसाठी 2018 मध्ये झालेल्या पहिल्या सामाईक भर्तीमध्ये स्तर 1 च्या 63202 पैकी 12,504 पदे ही राखून ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे, रेल्वे भर्ती मंडळाने सीईएन 01/2019 अंतर्गत जाहिरात दिलेल्या स्तर-1 च्या 1,03,769 पदांपैकी 207,34 पदे ही शिकाऊ उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत.
हे शिकाऊ उमेदवार आता विहित भरती प्रक्रिया, म्हणजे इतर सर्व उमेदवारांना विद्यमान नियमांनुसार उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी न करता रेल्वेमध्ये नियुक्तीची मागणी करत आहेत.
घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करत असल्याने ही मागणी स्वीकारणे व्यवहार्य नाही. याशिवाय निष्पक्ष निवड समाविष्ट असलेल्या प्रक्रियेशिवाय कोणताही रोजगार प्रदान केला जाऊ शकत नाही, असा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालही दिला आहे .

Tags: govtjobsindiaindianrailwayjobs
Previous Post

घरबसल्या शिक्षणासाठी लवकरच डिजिटल विद्यापीठे

Next Post

अरूण जाखडे यांचे प्रकाशनविश्वात मोठे योगदान

Next Post
अरूण जाखडे यांचे प्रकाशनविश्वात मोठे योगदान

अरूण जाखडे यांचे प्रकाशनविश्वात मोठे योगदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In