Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या रथाचा गौरव

प्रजासत्ताक दिन संचलनात उत्तर प्रदेशच्या रथाला सर्वांधिक पसंती

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
February 5, 2022
in आजचा भारत
0
महाराष्ट्राच्या रथाचा गौरव

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन संचलन 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.
लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली. महाराष्ट्राचा चित्ररथ ‘महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ या संकल्पनेवर आधारित होता.


उत्तर प्रदेशाला (लोकप्रिय पसंती) द्वितीय क्रमांक मिळाला, तर ‘जम्मू आणि काश्मीरचा बदलणारा चेहरा मोहरा’ या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला.
तीन सुरक्षा सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/इतर सहाय्यक दल आणि विविध विभागातील दल, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
समितींच्या मूल्यांकनाच्या आधारे, भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्कृष्ट संचलन दल म्हणून निवडण्यात आले आहे.


26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे सहभागी झालेल्या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवडल झाली. उत्तर प्रदेशचा चित्ररथ ‘एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम’ या संकल्पवेवर आधारित होता.
दुसरे स्थान कर्नाटकच्या ‘पारंपरिक हस्तकले’ वर आधारित चित्ररथाला मिळाले. तिसरे स्थान ‘मेघालयच्या राज्याची 50 वर्षे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचगट यांना मानवंदना’ या विषयावरील चित्ररथासाठी मेघालयला मिळाले.


केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या श्रेणीमध्ये शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ होती, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेवर आधारित होता. संचलनामध्ये केंद्रीय मंत्रालये/विभागांचे नऊ चित्ररथ सहभागी झाले होते.
‘सुभाष @125’ या संकल्पनेवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (सीपीडब्लूडी) आणि ‘वंदे भारतम’ नृत्य गटाची विशेष पारितोषिक श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे.

लोकप्रिय निवड पुरस्कार
या व्यतिरिक्त, पहिल्यांदाच, मायजीओव्ही (MyGov) व्यासपीठाद्वारे, लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संचलन दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मतदान करण्यासाठी सर्वसामान्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 25-31 जानेवारी 2022 दरम्यान ऑनलाइन मतदान घेण्यात आले.
लोकप्रिय निवडीनुसार, भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवडली गेली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम संचलन दल म्हणून मायजीओव्हीवर (MyGov) सर्वाधिक मते मिळाली.
लोकांच्या निवडीवर आधारित केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये दळणवळण मंत्रालय/टपाल विभागाच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आले. ‘भारतीय टपाल: 75 वर्षे @ संकल्प – महिला सक्षमीकरण’ ही चित्ररथाची संकल्पना होती.

Tags: 26januaryincrediblemaharasthraindiaindiaincrediblemaharashtra
Previous Post

स्वस्त औषध केंद्रे १०,५०० पर्यंत वाढणार

Next Post

महाबँकेला हवे आहेत अधिकारी

Next Post
महाबँकेला हवे आहेत अधिकारी

महाबँकेला हवे आहेत अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In