नवी दिल्ली : भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला आज 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. धोरणात्मक असो, आर्थिक किंवा लोकांशी परस्पर संपर्क असो प्रत्येक क्षेत्रात आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत.

ट्विटच्या शृंखलेत पंतप्रधान म्हणाले; आज आपण भारत आणि जपान या उभय देशांदरम्यानच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 70 वर्षे साजरी करत असताना, धोरणात्मक असो, आर्थिक किंवा लोकांशी परस्पर संपर्क असो, प्रत्येक क्षेत्रात आपले संबंध अधिक दृढ झाल्याचे पाहून मला आनंद होत आहे.”

वार्षिक शिखर परिषदेसाठी अलीकडेच भारत दौ-यावर माझे मित्र पंतप्रधान किशिदा आले असताना कोविडपश्चात जगात आपली विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करण्यात आला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत कार्यरत राहण्यासाठी उत्सुक आहे.”







