Thursday, February 5, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

सर्वांत मोठ्या विमा कंपनीत गुंतवणूक संधी

एलआयसी आयपीओतून श्रीमंत होण्याची संधी

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
May 5, 2022
in आजचा भारत
0
सर्वांत मोठ्या विमा कंपनीत गुंतवणूक संधी

मुंबई – एलआयसी आयपीओची दोन दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. एलआयसीही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे हा आयपीओ बाजारात यायला विलंब झाला. मात्र, पहिल्याच दिवशी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. फक्त हा आयपीओ डोळ्यांसमोर ठेवून गेल्या महिनाभरात प्रचंड डीमट खाती उघडण्यात आली आहेत.
सेबीने एलआयसीने 13 फेब्रुवारी 2022 ला दाखल केलेल्या दस्तऐवजातील मसुद्याला (डीआरएचपी) सेबीने मान्यता दिली आहे. त्यानंतर या शेअरचा रस्ता मोकळा झाला. सरकारने एलआयसीमध्ये जवळपास 31.6 कोटी शेअर्स म्हणजेच 5% समभाग विकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत 60,000 कोटी रुपये येतील असा अंदाज आहे.

पॉलिसीधारकांना संधी
एलआयसी पॉलिसीधारकांना आयपीओमधून कमाई करण्याची जबरदस्त संधी आहे, जरी यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी असाव्यात – एक म्हणजे तुमच्या एलआयसी पॉलिसी खात्याशी लिंक केलेले पॅन आणि दुसरे म्हणजे डीमॅट खाते.
पॅन क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे. हा आयपीओ 10 टक्के पर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. पॉलिसीधारकांनी त्यांचे पॅन तपशील एलआयसी रेकॉर्डमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. डीमॅट खातेदेखील असणे देखील आवश्यक आहे.
पॉलिसीधारकांनी रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. जर ते बरोबर नसेल तर पॅन माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या पॉलिसी धारकाकडे सध्या डीमॅट खाते नसेल, तर त्याने ते स्वतःच्या खर्चाने उघडण्याचे नियोजन करायला हवे.
1) https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा.
2) पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन तपशील भरा, तसेच कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर सबमिट बटण दाबा.
3) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर स्टेटस तुमच्या समोर दिसेल.
याप्रमाणे अपडेट करू शकता
1) LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://licindia.in/
2) ‘ऑनलाइन पॅन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
3) त्याच पेजवरील ‘प्रोसीड’ बटणावर टॅप करा.
4) तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा.
5) बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
6) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून OTP साठी विनंती करा.
7) ओटीपी मिळाल्यावर तो पोर्टलमध्ये टाका आणि सबमिट करा.
8) फॉर्म सबमिट केल्यानंतर, नोंदणी विनंती यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल.

Tags: IPOLICआयपीओएलआयसीश्रीमंतव्हा
Previous Post

जनरल नरवणे यांना मानवंदना

Next Post

कान्समध्ये आर. माधवन निर्मित ’रॉकेट्री’चा वर्ल्ड प्रीमियर

Next Post
कान्समध्ये आर. माधवन निर्मित ’रॉकेट्री’चा वर्ल्ड प्रीमियर

कान्समध्ये आर. माधवन निर्मित ’रॉकेट्री’चा वर्ल्ड प्रीमियर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In