Wednesday, February 4, 2026
  • Login
rugvedasstudio
Advertisement
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया
No Result
View All Result
rugvedasstudio
No Result
View All Result

जागतिक संवादावर उपराष्ट्रपतींचा भर

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तीन देशांच्या दौ-यावर

Team Rugvedas Studio by Team Rugvedas Studio
June 4, 2022
in आज जगात
0
जागतिक संवादावर उपराष्ट्रपतींचा भर

डकार (सेनेगल) : लोकशाहीत राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकमेकांप्रती आदर असणे आवश्यक आहे, वादविवाद, चर्चा आणि संवाद हे संसदीय कार्यपद्धतीचे मूलमंत्र आहेत, यावर उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी भर दिला.
गॅबॉन, सेनेगल आणि कतार या तीन देशांच्या दौ-यावर असलेल्या नायडू यांनी शुक्रवारी सेनेगलची राजधानी डकार इथे सेनेगलच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष मुस्तफा नियासे यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावर संवाद साधला.


जागतिक स्तरावर शांतता निर्माण करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी कार्य करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. प्रगतीसाठी शांतता ही पूर्वअट असल्याचे सांगून जगातील सर्व समस्यांवर शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघू शकतो अशी भारताची भूमिका असल्याचे नायडू यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आणि आफ्रिकेतील सर्वात स्थिर आणि आदर्श लोकशाही असलेला सेनेगल ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांची नैसर्गिक भागीदार आहेत आणि त्यांच्यात नैसर्गिक आत्मीयता आहे, असे त्यांनी सांगितले. सेनेगलने आपल्या निर्मितीपासून अध्यक्षीय, संसदीय आणि स्थानिक निवडणुका अत्यंत शांततेत , मुक्त, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने घेतल्याबद्दल नायडू यांनी त्यांचे कौतुक केले. भारताप्रमाणेच, राजकीय स्थैर्य, आर्थिक वाढ, सामाजिक एकता आणि आंतरराष्ट्रीय समुदायात महत्त्वाची भूमिका बजावणारी लोकशाही ही सेनेगलची बलस्थानं आहेत ,” असे ते म्हणाले.

Tags: indiameaindiamvainkaiyyanaydunaydusenegalvicepresidentindia
Previous Post

राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी अर्ज मागवले

Next Post

राजकारणावरील जहाल भाष्य करणारा ‘इर्सल’ चित्रपट रिलीज!

Next Post
राजकारणावरील जहाल भाष्य करणारा ‘इर्सल’ चित्रपट रिलीज!

राजकारणावरील जहाल भाष्य करणारा 'इर्सल' चित्रपट रिलीज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

‘ इये मराठीचिये नगरी ‘- मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कविता

February 27, 2024
पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

पंतप्रधानांचे लढाऊ विमानातून उड्डाण

November 26, 2023
राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

राणी मुखर्जींना आवडते ‘ब्लॅक’मधील भूमिका

November 26, 2023
श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

श्रीकांत सराफ यांची ‘तितर बितर’ कादंबरी चर्चेत

September 8, 2023
परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

परिवर्तन परिषदेत विविध विषयांवर मंथन

September 7, 2023
सातवी माळ – कार्ल्याची एकवीरा आई

एकवीरा देवीगडावर लवकरच रोप वे

September 3, 2023
  • ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होम
  • आज जगात
  • आजचा भारत
  • आजचा महाराष्ट्र
  • आजचे पुणे
  • कविता/साहित्य
  • प्रकाशित पुस्तके
  • लघुपट
  • सरकारी नोकरी
  • स्कील इंडिया

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In